जगत सम्राट अशोक यांची जयंती मोठया जल्लोषात साजरी करा
चैत्र शुक्ल अष्टमी (सन २०१६ मधे १४ अप्रैल, ही तारीख दर वर्षी बदलेल )
भारतीय लोकांच्या डोक्यातून सम्राट अशोकाला मोठया चतुराई आणि चलाखीने ब्राम्हणांनी
विसरवून दिले आहे, त्यांचा विसर पडलेला
आहे. बौद्ध धर्म म्हणजे ‘समता, स्वतंत्रता, बंधुत्वा, आणि
न्यायाची’ शासन पद्धती किंवा समाज व्यवस्था नष्ट करण्यासाठी ब्राम्हणांना
अशोकाच्या अवशेषांना देखील नष्ट करणे फार आवश्यक होते. त्यातल्या त्यात त्यांनी अशोका संबंधित
कार्यक्रमांना काल्पनिक रामाच्या उत्सवामध्ये बदल केला. सम्राट अशोकाच्या जन्म दिवसाला ब्राम्हणांनी रामजन्म
दिवस म्हणून परिवर्तन केले, आणि अशोकाने ज्या
दिवशी धम्मदिक्षा घेतली त्या विजयादशमी च्या रामाची विजयादशमी म्हणून रुपांतरीत
केले. हे दोन्ही दिवस फक्त भारतातच नाही
तर संपूर्ण देशाच्या इतिहासात फारच महत्वपूर्ण आहेत. जर सम्राट अशोकानी बौद्ध
धम्माची
दिक्षा घेतली नसती तर कदाचित आज जगात बौद्ध धम्म तुम्हाला दिसला नसता. याच्याहि पुढे कदाचित जगात ‘समता, स्वतंत्रता, बंधुत्व, आणि न्याय’ याचे देखील अस्तित्व दिसले नसते. असे बोलणे वावगे ठरणार नाही.
सम्राट अशोकाने बौद्ध धम्माची
दिक्षा घेतल्यानंतर संपूर्ण जगात विद्वान बौद्ध
भिक्षु पाठविले होते, त्यांनी त्या त्या देशाच्या
स्थानिक भाषेत बुद्धाचे तत्व दगडांमध्ये कोरले आणि बुद्ध स्तुपांची निर्मिती केली.
जपान, चायना, रशिया, श्रीलंका, इंडोनेशिया, अरब, आफ्रिका, युरोप, अमेरिका
या सर्व देशामध्ये बुद्ध आणि त्यांच्या विचारांना ओळखण्याचे श्रेय मात्र अशोक आणि
फक्त अशोकालाच जाते. भूमध्य सागराच्या परिसरात बुद्ध विचारांवर आधारित यहुदी
धर्माची स्थापना मोजेसने ई. पू. १८० मध्ये केली. त्यांची समाधी काश्मीर मध्ये
दिसून आली. त्याच प्रकारे यहुदी धर्मात जन्मलेल्या जीजस हा भारतात बौद्ध लामा च्या
स्वरुपात राहिला. आणि त्यांची समाधी सुद्धा कश्मिर मध्येच मिळाली आहे. हिब्रू
भाषेत लिहिलेले ‘ओल्ड सी स्क्राल’ हे बौद्ध भिक्षुद्वारे लिहिलेले बौद्ध प्रवचन
होय. जीजस च्या पाचशे वर्षानंतर लाल समुद्राच्या काठावर अरब मध्ये जन्मलेल्या
मोहम्मदने पुन्हा बौद्ध विचाराच्या आधारावर इस्लामची स्थापना केली. म्हणून बायबल
आणि कुरान या दोन्ही ग्रंथांचे मुल तत्व ‘दहा आज्ञा’ मध्ये पंचशिलेचा क्रम जसा चा तसा
आहे. जगात बुद्धाची पहिली मूर्ती अरब देशातील लोकांनी बनवलेली आहे, जे पूर्वी बौद्धाच होते
मात्र आज ते मुस्लिम आहेत. आफ्रिकन लोकांची काल्पनिक धारणा आहे की बुद्ध हे
आफ्रीकेचेच होते, कारण बुद्धाच्या
डोक्यावरील केसांची रचना आफ्रिकन लोकांसारखी आहे. आज ख्रिश्चन किंवा इस्लामचे
स्वरूप काहीही असो मात्र त्यांचे मूळ हे बुद्ध तत्वावर आधारित आहे, याचे पुरावे आज बऱ्याच
प्रमाणात उपलब्ध आहेत.
सम्राट अशोकाचा चार सिंहाचा
स्तंभ चायना, जपान, रशिया, ओस्ट्रेलिया या सर्व देशात
पाहायला मिळतो. पाली नावाचे गाव किंवा शहर भारतात बऱ्याच ठिकाणी पसरलेले आहेत, जे की अशोकाचे प्रशासन
केंद्र होते. जर अशोक नसते तर बौद्ध धर्म बिहार आणि उत्तरप्रदेशाच्या बाहेर गेले
नसते. भारतात त्रिपिटक तर ब्राहामांनी जाळून टाकले होते. परंतु ते श्रीलंकेतून
भारतात परत आले, त्याचे श्रेय सुद्धा अशोकालाच. त्याने जर दगडांवर शिलालेख कोरले
नसते तर, इंग्रजांनी भारतात येऊन परत बुद्ध धम्मावर
पुस्तके लिहिली नसती, आणि बाबसाहेबाना पण
कदाचित बौद्ध धम्म आणि त्याचा इतिहास आणि त्याच्या वचनांची माहिती झाली नसती. अशा
महान जगत सम्राटाची जयंती भारतात साजरी केल्या जात नाही, ही मोठी लाजेची आणि खंताची बाब आहे. चायनातील लोक प्रत्येक वर्षी
ही जयंती साजरी करतात. सन २०१० मध्ये चायनाच्या मदतीने दिल्ली येथे परराष्ट्र
मंत्री एस. एम. क्रिष्णा यांच्या उपस्थिती मध्ये साजरी करण्यात आली. त्या दिवशी एप्रिल महिन्याची १२ तारीख होती. तेव्हा
पासून महाराष्ट्रात काही लोक १२ एप्रिल या दिवशीच अशोक जयंती साजरी करतात. मात्र
अशोक जयंती मनाविण्याचा उदेश्य असायला हवा. या देशातील प्रत्येक धर्माच्या लोकांना
काल्पनिक राजाच्या कथेतून बाहेर काढून, परत समता, स्वतंत्रता, बंधुता
आणि न्याय या तत्वांची ओळख होने फार गरजेचे आहे. बुद्ध तत्व हे फक्त बौद्धांची
मालमत्ता नाही. ती या जमिनीवरील प्रत्येक जीविताची आहे. बौद्धांनी आपल्या बुद्धत्वाचे भान ठेऊन, संपूर्ण जगाला अशोकाची ओळख करून द्यावी लागेल.
भारत देशाची ओळख ही १२व्या
शतका पर्यंत ‘प्रबुद्ध भारत’ या रूपातच होती. भारतातील हिंदू देशवासियांना हे अवगत
करून द्यायला हवे की या देशाला परत ‘प्रबुद्ध भारत’ बनविण्याचे स्वप्न स्वामी
विवेकानंद यांनी देखील बघितले होते. ज्याने या अभियानाची सुरवात १८९२ मध्ये
भारताची “आर्थिक राजधानी” मुंबई येथील कान्हेरी गुंफेच्या विश्वविद्यालयातून सुरु
केली होती. ज्याने अनागरिक धम्मपाल यांचा शिष्य बनून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली
होती. देशाची आर्थिक प्रगती, पुल, इमारतींची निर्मिती आणि तंत्रज्ञानाच्या
जोपासनेचे सरळ संबंध बौद्ध सिध्न्तांशी आहेत. अशोकाच्या साम्राज्यात जातीरहित, नैतिक, शिलसंपन्न गुणांचा सामाजिक विकास ९२% होता. जगातील
इतर देशांमध्ये आर्थिक गुंतवणुकीचा विकास ६५% होता. सामाजिक आणि आर्थिक विषमता नाही च्या बरोबर होती.
आणि प्राचीन प्रबुद्ध भारताचे साम्राज्य जागतिक (ग्लोबल) महाशक्ती होते.
सम्राट अशोकाद्वारे मानव
आणि राष्ट्र, निर्मितीच्या आदर्शाला आठवणीत ठेऊन प्रत्येक
वर्षी “चैत्र शुक्ल अष्टमी “ ला मोठया संखेत अखंड प्रबुद्ध भारताच्या साम्राज्याची
राजधानी पाटलीपुत्र येते लोक उत्सवाचे आयोजन करीत असत. फाहीयान जेव्हा भारतात आला, तेव्हा त्याने हा उत्सव स्वत बघितला होता. सम्राट
अशोकाने संपूर्ण जगात या महान संदेशाला ८४०००
स्तूपाच्या रुपामध्ये अमेरिका ते जपान, इंग्लड
ते आफ्रिका, या सर्व जागी
प्रस्थापित केले. सम्राट अशोकाने त्या
महान बुद्धच्या समता, स्वतंत्रता, बंधुत्वा, आणि
न्याय या संदेशाला शिलालेखावर कोरले आणि या प्रकारे ते जगात प्रथम संविधान
निर्माता म्हणून ओळखल्या गेलेत. जगात सर्वत्र पसरलेल्या संविधानाच्या संदेशावर
आधारित इंग्लड ने १२१५ मध्ये त्यांचे संविधान मग्ना कोर्टा ( महान संविधान) बनविले
आणि अमेरिकेच्या युनाईटेड देशाने १७८७ मध्ये आपला संविधान बनविला. या सर्व
संविधानात बुद्धाचे मूळतत्व ‘समता, न्याय, बंधुत्व, आणि स्वतंत्रता’ यांचे मुख्यतया उल्लेख आहे.
अशोक जयंती ही “चैत्र शुक्ल
अष्टमी” म्हणजेच तिथी च्या दिवशीच साजरी करायला पाहिजे, ज्या प्रमाणे आम्ही सर्व
बुद्ध जयंती तिथी प्रमाणे साजरी करतो. आम्हाला हे माहिती पाहिजे की तिथी आणि
कालगणना ब्राम्हण वा वैदिकांची देन नाही. मूलतः हे भारतातील विद्वान बौद्ध भिक्षूंनी
निर्माण केलेली आहे, जे की मिस्त्र च्या खगोल शास्त्रीयाकडून घेतले गेले आहे. भारताचे
कॅलेन्डर ज्याला की हिंदू कॅलेन्डर समजल्या जाते, ते हिंदू कॅलेन्डर नसून बौद्ध
कॅलेन्डरच आहे. या सत्याचा पुरावा मी माझ्या महाशिवरात्री बद्दलच्या मागील लेखात दिला
होता. जसे हिंदू म्हंटल्या जाणऱ्या कॅलेंडर मधून ब्राह्मण ‘अशोक विजयादशमीला’ गायब
करू शकले नव्हते, तसेच आजही त्या कॅलेंडर मध्ये “चैत्र शुक्ल अष्टमी” ला अशोक
अष्टमी म्हंटले जाते. हिंदू धर्म हा विकृत बौद्ध धर्मच आहे. भारताचा तिथी कॅलेन्डर
हा चंद्र्कलेच्या गणने नुसार चालत असतो. तो जास्त संयुक्तिक आहे. आजचे इंग्रजी
कॅलेन्डर जे सेंट. गेग्ररी ने १५८२ मध्ये जुलियन (जुलियस सीजर च्या नावाने ई. पू.
४५) कॅलेन्डर वरून तयार केले होते. जरी ते अर्ध्याअधिक देशांमध्ये मानले जात आहे. तरी, जगात सर्वाधिक प्राचीन कॅलेन्डर
जसे की बेबिलोनियान, कोरियन, असिरीयान, चायनीज, मिनगाऊ, जापनीस (प्राचीन हान कॅलेन्डर), बेनजानटाइन, ज्यू (हिब्र कॅलेन्डर) इत्यादी चंद्र आणि सूर्य
(पोर्णिमा, अमावस्या, दिवस) कालगणनेवर आधारित आहेत. इतकेच नव्हे तर आज
ही भारतात इंग्रजी म्हंटल्या जाणाऱ्या कॅलेन्डर
प्रमाणे जगातल्या कीत्तेक देशांतील शासकीय कामकाजामध्ये गग्रोरीयान (ईग्रजी)
कॅलेन्डर वापरात आणले जाते, परंतु आज ही दररोजच्या काजकामासाठी चंद्रकाळ गणनेवर आधारित
कॅलेंडरचाच उपयोग केल्या जातो. याचे मूळ कारण हे आहे की इंग्रजांनी जगातील बहुतांश
देशावर राज्य केले आहे.
ब्राम्हणांनी या देशावर
राज्य करण्यासाठी भारतातील हिंदू आणि बौद्धा मध्ये भांडणे लावण्यात मोठ्या
चालाखीने यश मिळवले. ब्राम्हणांनी मोठ्या हुशारीने लोकांना याचा विसर पाडून दिला
आहे की हिंदू, मुस्लीम, सिख, इसाई, हे सर्वच पूर्वी बौद्ध होते.
आणि ब्राम्हणांनी सर्व धर्मामध्ये मुख्य धर्मगुरु स्वतःला करून घेतले. या सत्याला
जाना आणी आपल्या डोक्यातून ‘तिथी’ या वैदिक आहेत हा गैरसमज काढून टाका. करूणा, सत्य, अहिंसा या सर्व बौद्ध नैतिक सभ्य संस्कृतीच्या विचारांना
प्रवाहित करण्यासाठी आम्हाला अशोक जयंती ही स्वतंत्र रुपात साजरी करायला हवी. जेणे
करून त्याच्या बेजोळ उदार आणि सहिष्णू कामांची ओळख देशातील प्रत्येक नागरिकाला होईल.
जे जगात कुठल्याच राजा ने केले नाही, जसे की
त्याचा एक आदेश होता की “मी जरी झोपलो असलो, घोड्यावर असलो, जेवत असलो, बसून असलो, चालत असलो, लढाईत असलो, तरी कुठल्याही वेळी कुठलाही
सामान्य व्यक्ती मला भेटू शकतो.” त्याने मनुष्यासाठीच नव्हे तर प्राण्यांसाठी
देखील दवाखाने बनविले होते, रस्त्याच्या दोन्ही कडेला घनदाट झाडे लावली होती, त्याच बरोबर पाण्याची देखील व्यवस्था केली होती.
असे पत्रक छापून वाटायला हवेत. जेणे करून अशोकाच्या प्रती मनात श्रद्धा आणि आपुलकी
निर्माण होईल. असे आव्हाहन करायला हवे की “अशोक चक्र आमच्या राष्ट्रध्वजावर आहे, त्याची
चार सिन्हांची राजमुद्रा आपली देशाची राजमुद्रा आहे, त्याच्या प्रशासन पद्धतीचा ठसा फक्त आमच्यावरच
नाही तर, देशाच्या संविधानावर
पण आहे. परंतु अश्या करुणासागर जगत सम्राटाचा जन्मदिवस आपण का साजरा करीत नाही ?”
असे पत्रक ब्लिस आणि मैत्रेय संघाने तयार केले आहेत. हे पत्रक आम्ही हिंदू
लोकांच्या कार्यक्रमात देखील वाटत असतो.
त्याचा जन्मदिवस या
देशाच्या महान राजा च्या स्वरुपात मनवावा. देशवासियांना विनंती आहे की सम्राट अशोकाची जयंती “चैत्र शुक्ल अष्टमी” लाच मोठ्या जल्लोषात
आणि वाजत गाजत मनवावी. मिरवणूक काढावी. देशाचा राष्ट्र ध्वज, चार सिंहांची मुद्रा आणि सम्राट अशोकाचे मोठमोठे
कट आउट लावावे. मिरवणुकीत राष्ट्रध्वजा
सहित फक्त आणि फक्त देश गौरवाची गाणी वाजवावीत. विशेषतः रंगबिरंगी कपडे आणि
नटूनथटून मिरवणुकीत शामिल व्हावे. हा भारत देशाचा राष्ट्रीय सन वाटावा. सम्राट
अशोकाला कुठल्याही एका धर्माचा राजा न दर्शविता देशाच्या महानतम राजाच्या स्वरुपात
प्रदर्शित करावे. बौद्धांनी अन्य धर्मियांचा द्वेष त्यागून, बुद्ध आणि बाबासाहेबांना
लोकांवर जबरदस्ती ने थोपन्याची आपली संकुचित वृत्ती त्यागून संपूर्ण जीवित
कल्याणाकरिता विचारपूर्वक आणि संयमाने कृतीशील कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. मोठ्या
संयमाने ‘समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय’च्या
बुद्ध तत्वांना पसरविण्याची जबाबदारी निभवावी लागेल. जयंतीचा उत्सव शक्यतो अन्य
धर्मियांकडून राबवावा. त्यासाठी त्यांना प्रत्यक्ष भेटून माहिती द्यावी लागेल. शक्य
असल्यास राजकीय पक्षांना सुद्धा शामिल करावे. मिरवणुकीचे उद्घाटन शहराचे कलेक्टर, तहसीलदार अथवा आयुक्त यांच्या हातून करावे. बौद्धांनी
लक्षात ठेवणे आवश्यक आहे की अशोकाची जयंती कुठल्या बंद हाल अथवा मैदानात अन्य महापुरुषांसोबत
घेवू नये. अशोकाची जयंती स्वतंत्र मिरवणूक काढूनच मनवावी, अन्यथा बिलकुल मनवू नये. बाबासाहेबांनी
म्हंटले आहे की जो इतिहास विसरतो, ते इतिहास रचू शकत नाही. यासाठी या देशातील लोकांना खरा
इतिहास पटवून पुन्हा जम्बुद्विपाचा प्रबुद्ध इतिहास प्रस्थापित करावा लागेल. जेणेकरून
ब्राहमणी जाळ्या मध्ये अडकलेल्या आमच्या भारतीय देशवासियांना बाहेर काढून ‘समता, स्वतंत्रता, बंधुता
व न्याय’ च्या प्रेममय मधुर वातावरणामध्ये आणले जावे. ही जबाबदारी पेलण्याची ताकत
फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या अनुयायांमध्ये आहे.













